गोसंवर्धन - गाईंना कामधेनू का म्हृणतात? ती आपल्याला समृद्धी कशी बहाल करते याचे प्रात्याक्षिक म्हणजेच संस्थेची अद्ययावत गोशाळा. गाईंच्या दूध, ताक, गोमूत्र व गोमूत्रापासून- दूध, तूप, गोमूत्र अर्क, धनवटी तक्रारीष्ट, मसाज तेल व गोमय साबण यासारख्या मौल्यवान व आरोग्यवर्धक उत्पादनांमुळे गाईंचे अनन्यसाधारण महत्व परिसरातील वनवासी बांधवांना समजू लागले आहे. गोबरगॅस सयंत्रामुळे इंधनासाठी होणारी जंगलतोड रोखता येणे शक्य असल्याचे प्रात्याक्षिक त्यांना दिसते. आज गाई, वासरे, बैल अशी 35 संख्या गोशाळेत आहे. गाईंचे दूध केवळ वासरांसाठी या वनवासींच्या संकल्पनेला त्यामुळे छेद दिला गेला असून त्यांनीही आता गोपालन सुरू केले आहे. उत्पादनाची शुध्दता जपली जात असल्याने त्यांना चांगली मागणी असून यातून गोशाळेचा खर्च वजा जाता, काही रक्कम संस्थेच्या इतर उपक्रमांसाठी उपलब्ध होऊ लागली आहे.