En | Mr

पनवेल तालुक्यातील देहरंग परिसरात वसलेल्या असाहाय्य- दुर्बल- वंचित वनवासी बांधवांची यथाशक्ती सेवा करण्याच्या उद्देशाने प्रेरित सर्वसामान्य औद्योगिक कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली 'सत्कर्मश्रध्दाश्रय' हि संस्था गेली ४ दशके यशस्वीरित्या कार्यरत आहे. संस्थेने स्थापन केलेल्या 'माउली सेवा संकुलात' संस्थेचे कार्य चालते.

आमचे सेवा उपक्रम आम्ही साभिमान सादर करीत आहोत

  • प्राथमिक वैद्यकीय सेवा केंद्र
  • फिरता दवाखाना
  • वनवासी विद्यार्थी वसतिगृह
  • समाज मंदिर
  • गोशाळा
  • बायोगॅस सयंत्र
  • सौर ऊर्जा व्यवस्थापन
  • जलकुंभ
  • औषधी वनस्पती लागवड

कार्य :

आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, स्वास्थ्य आणि कौशल्य विकासाला सर्वतोपरी हातभार लावणे

दृष्टिकोन :

महत्वाचे घटक :

  • शिक्षण : नि:शुल्क वसतिगृह सुविधा
  • आरोग्य : नि:शुल्क वैद्यकीय तपासणी व औषधोपचार तसेच वेळोवेळी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
  • संस्कार केंद्र : सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचे आदिवासी विद्यार्ध्यांवर संस्कार करणे हे उद्दिष्ट
  • कौशल्य विकास : १०वी, १२वी नंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी नियमित प्रशिक्षण सुविधा
  • समाज मंदिर : आदिवासी समाजाचे एकीकरण करून सांस्कृतिक संबंध वाढीस लावण्यासाठी
  • वरील गोष्टी साध्य करण्यासाठी सेवाभावी,सहकार्यप्रवण अशा प्रयोजकांच्या सहभागासाठी संस्था सदैव प्रयत्नशील राहील.