माऊली विद्यार्थी वसतिगृह
माउली विद्यार्थी वसतिगृह परिसरातील वनवासी विद्याथ्याच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आल्याने 1996 सालापासून करवीर पिठाधीश श्री शंकराचार्य यांच्या पवित्र हस्ते उद्घाटन झालेल्या माउली विद्यार्थी वसतिगृहाच्या माध्यमातून 12 ते 15 विद्याथ्र्याच्या जीवन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थेने...
प्रार्थमिक आरोग्य केंद्र
1990 साली सुरू केलेले माऊली आरोग्य सेवा केंद्र गेली 26 वर्षे अविरतपणे सुरू असून एकूण 10,000 वनवासी लोकसंख्येपैकी 6,500 रुग्ण लाभार्थी झाले आहेत.
सिंचन प्रकल्प
संस्थेचे जलस्त्रोत, जलव्यवस्थापन 2 विहीरी, 4 कुपनलिका व गाढीनदितील डोह हे तीन मुख्य जलस्त्रोत आहेत. विहीर व कुपनलिकांचे पाणी साधारणतः डिसेंबर महिन्यांपर्यंत पुरते. पाण्याचा वापर सतत वाढता असल्याने गाढी नदीतून 4500 फूट जलवाहिनीद्वारे 400 फूट उंचीवर पाणी चढवून 22,000 लिटर्स क्षमतेच्या टाकीत साठवून केन्द्र परिसरात सर्वत्र जलवाहिन्यांमार्फत पुरविले जाते. विजेच्या अनिश्चिततेमुळे नदीवरील पंपासाठी डिजेल जनरेटर खरेदी केला आहे.
फलोत्पादन आणि फुलशेती
फलोद्यान, वनौषधी, रोपवाटिका आंबा, काजू, चिकू, पेरू, पपई, जांभूळ, सिताफळ इ. फळझाडांची लागवड केली आहे. तसेच कोरफड, कडूलिंब, पारिजातक, तुळस, वाळा, वेखंड व गवतीचहा इत्यादी वनौषधींची लागवडही केली आहे. या सर्वांची रोपे बनवून विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. कोरफड जेल, ओवाअर्क, जास्वंदप्रभा तेल इ. उत्पादनेही काढली जातात.
गोसंवर्धन
गोसंवर्धन गाईंना कामधेनू का म्हृणतात? ती आपल्याला समृद्धी कशी बहाल करते याचे प्रात्याक्षिक म्हणजेच संस्थेची अद्ययावत गोशाळा. गाईंच्या दूध, ताक, गोमूत्र व गोमूत्रापासून- दूध, तूप, गोमूत्र अर्क, धनवटी तक्रारीष्ट, मसाज तेल व गोमय साबण यासारख्या मौल्यवान व आरोग्यवर्धक उत्पादनांमुळे गाईंचे अनन्यसाधारण महत्व परिसरातील वनवासी बांधवांना समजू लागले आहे.