En | Mr

 

संस्थेचे जलस्त्रोत, जलव्यवस्थापन 2 विहीरी, 4 कुपनलिका व गाढीनदितील डोह हे तीन मुख्य जलस्त्रोत आहेत. विहीर व कुपनलिकांचे पाणी साधारणतः डिसेंबर महिन्यांपर्यंत पुरते. पाण्याचा वापर सतत वाढता असल्याने गाढी नदीतून 4500 फूट जलवाहिनीद्वारे 400 फूट उंचीवर पाणी चढवून 22,000 लिटर्स क्षमतेच्या टाकीत साठवून केन्द्र परिसरात सर्वत्र जलवाहिन्यांमार्फत पुरविले जाते. विजेच्या अनिश्चिततेमुळे नदीवरील पंपासाठी डिजेल जनरेटर खरेदी केला आहे. विहीरींवर बंधारे व कुपनलिका पुर्नभरणाचे प्रयोग सुरू असून त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्यात वाढ होत आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र मानून सर्व छतांचे पावासाळी पाणी मिळून 1,25,000 लिटर पाण्याचा साठा केला जातो. पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे.