फलोद्यान, वनौषधी, रोपवाटिका आंबा, चिकू, पेरू, पपई, जांभूळ, सिताफळ इ. फळझाडांची लागवड केली आहे. तसेच कोरफड, कडूलिंब, पारिजातक, तुळस, व गवती चहा इत्यादी वनौषधींची लागवडही केली आहे. या सर्वांची रोपे बनवून विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. कोरफड जेल, ओवाअर्क, जास्वंदप्रभा तेल इ. उत्पादनेही काढली जातात.वनवासी बंधूना मार्गदर्शक ठरणारा हा उपक्रम भविष्यात संस्थेसही स्वयंपूर्ण करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो.