आरोग्यसेवा केंद्र

Maulee-Health-Clinic

गेली चार दशके यशस्वीरित्या सुरु असलेल्या आरोग्यसेवा केंद्राद्वारे आम्ही १२,००० ग्रामस्थ रुग्णांना निःशुल्क औषधोपचार करीत आहोत. आमची दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा शिबिरे निःशुल्क चालविली जातात.हंगामी साथीच्या आजारापासून तसेच दीर्घमुदतीच्या आजारापासून ग्रामस्थांना मुक्त करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. हे संपूर्ण आरोग्यसेवा कार्य संस्था कोणतेही शुल्क न आकारता करीत आली आहे.