असहाय वनवासी समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग सुकर करणे, हजे मूलभूत उद्दिष्ट राखून सेवाकार्य करण्यापूर्वी वनवासी समाजामध्ये शिक्षणाच्या महत्वाची जागृती निर्माण करणे व त्याचबरोबर उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे यास प्राधान्य दिले गेले.
अशाप्रकारे शिक्षण देण्याचे कार्य अखंडपणे निःशुल्क राखण्याचे ध्येय आम्ही उराशी बाळगले. ज्याचे उत्तम परिणाम दिसून आले. शैक्षणिक कार्याबरोबरच संपूर्ण वनवासी समाज आरोग्याविषयी जागरूक असावा हेही आमचे उद्दिष्ट होतेच यानुसार आरोग्यसेवा केंद्र स्थापन करून वनवासी बांधवांसाठी अखंडपणे निःशुल्क औषोधोपचार करण्याचे ध्येय आम्ही निश्चित केले.
आमचे तिसरे उद्दिष्ट्य होते वनवासी तरुण तसेच स्त्रियांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणही निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देणे. परिणामी वनवासी स्त्रियांना व्यवसायाभिमुख करून स्वावलंबी बनण्यास मदत करणे, तरुणांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वयंरोजगाराभिमुख करणे हे आमचे ध्येय निश्चित झाले.
सत्कर्मश्रध्दाश्रय | Developed By Sanmisha Technologies